जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती;
कणकवली ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज हा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा करत सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला परवानगी मिळवली आहे. तसेच त्यांचा १५ मार्चला वाढदिवस होत असल्याने सिंधुदुर्ग शिवसेनेच्यावतीने कृतज्ञता सत्कार सोहळा भगवती मंगल कार्यालय येथे सकाळी ११.३० वाजता होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत जाणवली सोसायटी चेअरमन दामू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.१५ मार्चला ६८ वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.शासकीय महाविद्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खा.राऊत यांनी अथक परिश्रम करुन मंजूर करुन घेतले.शासकीय महाविद्यालयाची मागणी होत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दृष्टीने आनंदाचा दिवस आले आहे. ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर होतील,त्यावेळी खरा आनंद आम्हा सर्वांना होणार आहे.
कोल्हापूर, गोवा,मुंबई येथे उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.मेडिकल कॉलेज मध्ये उपचार होणार आहेत,हे आपल्यासाठी चांगले आहे,असे संजय पडते यांनी सांगितले. मेडिकल कॉलेज हे सिंधुदुर्गवाशियांचे स्वप्न होते,त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९६६ कोटी निधी मंजूर केला.तरीही मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून काहींनी अडथळे सुरु केले होते.त्या मंजुरीसाठी खा .राऊत यांनी पाठपुरावा केला.लोकसभेत आवाज उठवला, त्यानंतर मंजुरी मिळाली.खासगी कॉलेजला ५० लाख भरावे लागतात,परंतु जी मुले मेरिट मध्ये असतील त्यांना सवलती मध्ये डॉक्टर सरकारी मेडिकल कॉलेज होता येईल,कमी शुल्क आकारणीमध्ये हे श्रेय शिवसेनेचे आहे.मुलांनी निटमध्ये चांगला सराव केला तर यश मिळेल.मेडिकल कॉलेज साठी ४० एकर जमीन देण्यात आली आहे.पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांनी खा.राऊत यांचयसोबत पाठपुरावा केला.मेडिकल कॉलेज ची गैरसोय दूर झाली आहे.त्याचे खा.राऊत यांनी नेतृत्व करत मेडिकल कॉलेज मंजुरी मिळवली.जिल्हा शिवसेनेच्या वतीने कृतज्ञता सोहळा करण्यात येणार आहे.तरी शिवसैनिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.
