शिवडाव येथील मांडकार देवालयाचा उद्या वार्षिक सप्तप्रहर हरिनाम सप्ताह

कणकवली ता.१३-:* तालुक्यातील शिवडाव ओटोसवाडी येथील मांडकार देवालयाचा वार्षिक अखंड सप्तप्रहर हरिनाम सप्ताह सोमवार १४ मार्च रोजी साजरा होत आहे. तर महापुरुष देवालय पिंपळपार येथे त्रैवार्षिक श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे १६ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. सप्तप्रहर हरिनाम सप्ताहाची घटस्थापना १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता होणार असून सकाळी ११ वाजता पासून आरती दर्शन तीर्थप्रसाद सुरू राहणार आहे.

महापुरुष देवालय पिंपळपार येथे १६ मार्च रोजी आयोजित श्री सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सायंकाळी ५ ते ७ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा ७ ते ८:३० वा. आरती भजन, रात्री ८:३० ते ९:३०वा.महाप्रसाद, रात्री ९:३० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी ता. कुडाळ यांचा महान काल्पनिक दशावतार नाट्य प्रयोग “सैतानी पाश’ सादर होणार आहे. तरी भाविकांनी, नाट्यरसिकांनी तीर्थप्रसाद व दशावतार नाट्य प्रयोगाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शिवडाव ओटोसवाडी येथील श्री भूतनाथ बालगोपाळ मंडळाने केले आहे

You cannot copy content of this page