महाविकास आघाडीचा धिक्कार असो : कार्यकर्त्यांडून जोरदार घोषणाबाजी
*⚡वैभववाडी ता.१३-:* सायबर विभागामार्फत फोन टॅपींग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसीची वैभववाडीत होळी करण्यात आली. यावेळी वैभववाडी भाजपाच्या वतीने आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम.., महाविकास आघाडीचा धिक्कार असो… अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
महाविकास आघाडी सरकारकडून मुद्दामहुन विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे या कृतीचा निषेध म्हणून नोटीसीची होळी तालुका कार्यालया समोर करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर, सोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे, बंड्या मांजरेकर, महिला प्रतिनिधी प्राची तावडे, न. पं. समिती सभापती विवेक रावराणे, नगरसेविका यामिनी वळवी, रेवा बावधाने, अंकित सावंत, विनायक रावराणे, सिद्धेश कोकाटे, आर्यन खानविलकर, प्रशांत ढवण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो : वैभववाडीत नोटीसीची होळी करताना भाजपा कार्यकर्ते.
