बांदा दि.१३-:* बांदा येथील जिल्हा परीषद केंद्र शाळा क्र.१ मध्ये श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व बांदा नट वाचनालय यांच्या सयुक्त विद्यमानाने महीलादिनाचे औचीत्य साधुन खास विवाहीत महीलांसाठी वेशभुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
या स्पर्धेस उस्फुर्त प्रतीसाद लाभला. स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, डॉ. सोनल लेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश ठाकुर, बांदा नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, निलेश मोरजकर, सरोज नाईक, बांदा माजी सरपंच प्रियांका नाईक, श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या विश्वस्ता दर्शना केसरकर, राजश्री तेंडले, प्रियांका हरमलकर, बांदा नट वाचनालयाच्या महीला सदस्या स्वप्निता सावंत, मान्यवर म्हणुन उपस्थित होत्या. या स्पर्धेत भक्ती आळवे यानी प्रथम क्रमांक, श्वेता कोरगांवकर द्वितीय क्रमांक, स्वाती पाटील यांनी त्रुतीय क्रमांक पटकावीला. अनुजा महाजन, रिना मोरजकर, विनीता गोसावी, वर्षा नाडकर्णी, सरोज नाईक याना उत्तेजनार्थ पारीतोषीक देण्यात आले.
यावेळी पुडंलीक दळवी यांनी आपले विचार मांडताना बांदा नट वाचनालय व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाने महीलांसाठी हि स्पर्धा आयोजीत करून महीलांना व्यासपीठ देऊन त्याच्या सुप्त गुणाना , कलेला वाव मिळवून दिल्याबद्ल कौतूक केले. परीक्षक डॉ सोनल लेले यानी आपले विचार मांडताना जेष्ठ महीलानी या स्पर्धेत सहभागी आपली कला दाखवीली या बद्दल कौतुक केले. सोनल लेले व गणेश ठाकुर यानी या स्पर्धचे परीषण केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष व बांदा नट वाचनालयाचे सचीव राकेश केसरकर व सुत्रसंचालन व आभार जकाप्पा पाटील सर यानी केले.
