पुनर्मिलन सोहळा निमित्ताने टोपीवाला हायस्कुल १९७५-७६ दहावी बॅच विद्यार्थी पुन्हा शाळेत
मालवण ता.१३-:* ४६ वर्ष पूर्वीच्या आठवणींना उजाळा देत, मालवण येथील अ. शि. टोपीवाला हायस्कुल च्या १९७५-७६ सालच्या इयत्ता दहावी वर्ग बॅचचे माजी विद्यार्थी गेट टू गेदरच्या निमित्ताने एकत्र आली. मालवण बोर्डिंग ग्राउंड येथील सुलोचना श्रीपाद पाटील हॉल मध्ये टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक जोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी दिगंबर सामंत, विजय कामत, गोखले सर, तोरगलकर सर, गिरकर सर, काझी सर, धामपूरकर सर आदी तसेच सूत्रसंचालक म्हणून जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल प्रिन्सिपल निशिकांत पराडकर सर व्यासपीठावर उपस्थित होते. १९७५-७६ दहावी बॅच मधील अलका गावंडे-मालवणकर, अंजली सामंत, अन्वर शेख, भरत फणसेकर, चारुलता लाड, दशु सामंत, दत्ताराम बोडेकर, डॉ. गजानन वेल्हाळ (ऑनलाइन उपस्थित), जया कामतेकर, विलास केळुसकर, मधूमालती कोळंबकर, महेश मयेकर, महेश साटम, मंगल जाधव, मोहन तिरोडकर, मोहन उपरकर, मुग्धा काजरेकर, नाना मसुरकर, नंदा कांदळगावकर, नितीन साटलकर, गजानन पई, राजन मांजरेकर, रामदास कोचरेकर, रवी धुरी, संजय पाटील, शशिकांत कांबळी, श्रीधर गोरे, शुभी शिरोडकर, स्मित दत्तादास, स्मिता म्हाडगूत, सुभाष तळवडेकर, सुरेखा ओरसकर-वाळके, विलास टेमकर, उपेंद्र ठाकूर, विद्या कोरगावकर म्हापसेकर, सुनील आजगावकर, उदी देसाई आदी उपस्थित होते.
दुपार नंतर सर्व माजी विद्यार्थी यांनी तोंडवळी येथे एकत्र येत संवाद, गप्पाटप्पा, जुन्या आठवणींना उजाळा देत धमाल केली. या माजी विद्यार्थी पैकी डॉ. गजानन वेल्हाळ (केईएम हॉस्पिटल कम्युनिटी मेडिसिन विभाग प्रमुख) हे आपल्या सेवा कार्यामुळे या सोहळ्यास उपस्थित नव्हते. त्यांच्या अभिमानास्पद सेवा कार्याचा सन्मान म्हणून सर्वांच्या वतीने भरत फणसेकर यांनी या सोहळ्याला येताना मुंबई येथे डॉ. गजानन वेल्हाळ यांना मुंबई येथे सन्मानपत्र देत त्यांचा सन्मान केला होता. यावेळी उपस्थित माजी शिक्षकांनी आपुलकीने संवाद साधला. माजी विध्यार्थी वर्गाचे व विविध क्षेत्रात उज्वल यश प्राप्त सर्वांचे कौतुक केले. तुमच्या गेटटुगेदर मध्ये आमचे गेटटुगेदर झाले. अश्या भावना गोखले सर यांनी व्यक्त केल्या.
