मालवण ता.१३-:* तारकर्ली गावातील ज्येष्ठ कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शक विनायक कांदळगावकर हे बरेच वर्षे पॅरालिसिसने आजारी असल्याने तारकर्ली गावातील नवकलाकार नाट्य मंडळ तारकर्लीच्या पदाधिकारी कलाकारांनी कांदळगावकर यांच्या रहात्या घरी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करतानाच आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
विनायक कांदळगावकर यांनी तारकर्ली गावात अनेक कलाकार घडविण्याचे काम केले. मात्र सध्या ते आजारी आहेत. त्यामुळे नवकलाकार नाट्य मंडळाने त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करतानाच आर्थिक मदतही केली. यावेळी नवकलाकार नाट्य मंडळाचे पदाधिकारी आणि नाट्य कलाकार श्रीधर मोंडकर, गुंडू कांदळगावकर, कुणाल बापर्डेकर, धोंडी कांदळगावकर, सुरेश बापर्डेकर, वसंत मोंडकर आदी उपस्थित होते.
