ज्येष्ठ विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा-प्राचार्य देऊलकर

वेंगुर्ला ता.०५-:* विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण, सी.व्ही.रमण कसे घडले, त्यांचा रमण इफेक्ट व त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कष्टाला अपयश नाही. कष्ट करा असे आवाहन डॉ.विलास देऊलकर यांनी विज्ञान दिन कार्यक्रमावेळी केले.

बॅ.खर्डेकर महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजर करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.संजिव चमणकर, प्रा.एस.एच.माने, पदार्थ विज्ञान प्रमुख डॉ.वसतराव पाटोळे, प्रा.राजाराम चौगले व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आनंद बांदेकर, प्रयोगशाळा सहाय्यक संजय परब, प्रदिप बोवलेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

यावर्षी ‘इंटिग्रेटेड अप्रोच इन सायन्स आणि टेक्नॉलॉजी फॉर अ सस्टेनेबल फ्युचर‘ ही थीम घेऊन ‘करोना वायरस स्ट्रक्चर व वॅक्सिनेशन‘ व ‘इम्पॅक्ट व स्स्पिाॅन्स‘ या विषयावर रसायनशास्त्र विभागातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यातील पल्लवी गजानन भोगटे (प्रथम), अनिकेत संतोष वेंगुर्लेकर (द्वितीय), प्राची प्रसाद मुळिक (तृतीय), वैष्णवी रामचंद्र परुळकर (उत्तेजनार्थ) या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रा.आर.जी.चौगले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक तर प्रा.एस.एस.चमणकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page