८ मार्च रोजी महिला आणि पर्यावरण कार्यक्रम

वेंगुर्ला ता.०५-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयात इंडियन वुमन सायंटिस्टअसोसिएशन कोल्हापूर आयोजित राष्ट्रीय परिषदेचा भाग म्हणून महिला विकास कक्ष, बॅ.बी.के.कॉलेज, वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत मधुसूदन कालेलकर नाट्यगृह वेंगुर्ला येथे महिला आणि पर्यावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले आहे. तसेच त्याच दिवशी होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थीनींनी आपली नावे महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ.धनश्री पाटील किवा डॉ.एम.एम.मुजुमदार यांच्याकडे नोंदवावीत.

You cannot copy content of this page