मालवण ता.२७-:* रक्तदान अवयवदान देहदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी जिल्ह्यातील अग्रगण्य अशा ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग’ या संस्थेमार्फत ‘रक्तदान अवयवदान जागृती’ करण्याकरिता घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विद्यार्थी व खुल्या गटातून एकूण ३६४ स्पर्धकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष आंतरदेशीय पत्र लिहून स्पर्धा यशस्वी केली. सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातही अशी अभिनव स्पर्धा घेणारी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही पहिली संस्था आहे. या स्पर्धेत शालेय गटामध्ये २७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर खुल्या गटातून ९१ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी येथील स्पर्धकांनीही सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- सर्व गटातून सर्वोत्कृष्ट- श्री. प्रफुल्ल अनंत साने (डोंबिवली). खुलागट- प्रथम- किरण मोतीराम सावंत (भिरवंडे- कणकवली), द्वीतीय- सुकांती सखाराम पालकर (वैभववाडी), तृतीय- गीता गजानन लळीत(देवगड), उत्तेजनार्थ- शितल गोविंद गवस (तळकट), श्रुती केशव गोगटे (मालवण), स्वाती संजय खैरकर (नागपूर रामटेक). शालेय गट- (पाचवी ते सातवी)- प्रथम- हर्षिता नयनेश गावडे (६ वी, आरवली), द्वीतीय- विधी विरेंद्र चिंदरकर (७वी, कणकवली), तृतीय- वैष्णवी गणेश हावळ (५ वी, माडखोल सावंतवाडी), उत्तेजनार्थ- १)अक्षरा गोवींद नाईक (७वी ,केरवडे कुडाळ), २) केतकी प्रकाश आंबेरकर (६ वी, जामसंडे- देवगड), ३) मानसराज महेश गवस (७ वी, वाफोली सावंतवाडी). शालेय गट ८ वी ते १०वी- प्रथम- वैदेही अनिल सावंत (नाटळ कणकवली) द्वीतीय- नेहा सुधीर पाटील (जामसंडे देवगड) तृतीय- नेहल विजय परब(खानोली वेंगुर्ले), उत्तेजनार्थ- १)श्रद्धा शामसुंदर पोईपकर (१० वी, पोईप मालवण), २) सुदीप्ता चंद्रशेखर तेली (१० वी जामसंडे), ३)श्रुतिका देवदत्त जुवलेकर (८वी, उभादांडा वेंगुर्ले). स्पर्धेचे परीक्षण डॉ.वैभव आईर, अॅड.संदीप चांदेकर, साहित्यिक चंद्रकांत सावंत, प्रकाश तेंडोलकर यांनी केले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. बक्षीस वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर (९४०४७४०४९०) यांनी दिली आहे.
