मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भटवाडी बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित

निधी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव;अमित सामंत, प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब यांचे प्रयत्न सुरू

सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडीच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जागेमुळे रखडलं आहे. यासाठी सावंतवाडी नगरषरिदेकडून भटवाडी – बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित केलेली आहे. या जागेच्या मोबदल्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सावंतवाडी राष्ट्रवादीकडून मागणी केलेली असून याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबईकडे पाठविण्यात आलेला आहे.

यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. सावंतवाडीकरांना मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी राज्यमंत्री आ दीपक केसरकर यांनी संबंधित विभागाशी तसेच मंत्रीमहोदयांशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आ. दीपक केसरकर आणि संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांच लक्ष वेधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page