वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांचे निधन…

वेंगुर्ले ता.२७-:* वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे (वय ५४) यांचे आज २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्ष ते वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.

गेले पाच सहा दिवसांपूर्वीच ते आपल्या सातारा येथील मूळ गावी गेले होते. आज गावावरून ते वेंगुर्ले येथे येणार होते. मात्र काळाने डाव साधला आणि अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. डॉ. मुळे यांच्या निधनामुळे वैदयकीय क्षेत्रातील खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना ग्रामीण भागातील देवदूत असे म्हटले तरी ते वावग ठरू नये. साप या विषयावर त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. सर्पदंश या वर ते रामबाण उपाय करीत असत आणि सर्पदंश हे जास्त करून ग्रामीण भागातच होत असतात. विषारी सर्पदंश झालेला माणूस डॉ. मुळे यांच्या हातून कधीच दगावला नाही हे त्यांचं वैशिष्ट्य होत, त्यामुळे जास्त करून ग्रामीण भागाच मोठं नुकसान झालंय अशी भावना अनेक ग्रामीण भागातील नागरिकांमधून उमटत आहे.

You cannot copy content of this page