आंगणेवाडी सिंधुदुर्गात आणि पालकमंत्री उत्तरप्रदेश मध्ये….!

मनसेची टीका खरी ठरली -अमित इब्रामपूरकर

मालवण ता.२५ प्रफुल्ल देसाई-:* मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांना आंगणेवाडी यात्रेबद्दल आस्था नसल्याची केलेली टीका खरी ठरली असुन जत्रेदिवशी जिल्ह्यातील जनतेला वार्‍यावर सोडून पालकमंत्री उत्तरप्रदेशच्या निवडणुक प्रचारासाठी गर्क होते लोकांच्या प्रश्नाचे देणं घेणं नसणारा पालकमंत्री उदय सामंत यांच्या रूपाने जिल्हावासीयांना प्रथमच पहावयास मिळाल्याची जहरी टीका मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे .

इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जत्रेच्या दिवशी उत्तर प्रदेश मध्ये निवडणुक प्रचारासाठी जायचे असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी आंगणेवाडीत किंवा मालवण तालुक्यात नियोजन बैठक न घेता ती कुडाळ मध्ये घेतली हे आता स्पष्ट होत आहे. आंगणेवाडी वार्षिक उत्सवाची सर्व तयारी आंगणे कुटुंब , ग्रामस्थ, प्रशासन, व्यापारी यांनी केली .चोख नियोजन करून यशस्वीपणे पार पाडली.

त्यामुळे आंगणेवाडी यात्रेबाबत कोणतीही आस्था सामंत यांना नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी म्हटले आहे की, आंगणेवाडी यात्रेपूर्वी नियोजन बैठक आंगणेवाडीत न घेणारा पहिलाच पालकमंत्री आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ,प्रशासन,व्यापारी यांच्यासोबत आंगणेवाडीत अथवा मालवण तालुक्यात बैठक घेऊन जनमत जाणून घेणे गरजेचे असताना तसे न करता कुडाळ येथे स्वतःच्या सोयीने बैठक घेऊन हुकूमशाही पद्धतीने पालकमंत्री यांनी यात्रेवर निर्बंध लादले. अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली होती ती आता खरी ठरली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला वार्‍यावर सोडणारे पालकमंत्री जिल्ह्याचा विकास काय करणार? असा सवालही अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.

You cannot copy content of this page