कणकवली पत्रकार समितीच्या हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर ;

अथर्व म्हसकर , ऋतुजा परब प्रथम

कणकवली ता.२५-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावीतीने व ‘ पत्रकार आणि मित्र’च्या सहकार्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन या विषयावर आयोजित सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . यात नववी ते बारावीच्या गटात शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या अथर्व विश्वास म्हसकर याने तर पाचवी ते आठवीच्या गटातही शिवडाव माध्यमिक विद्यालययाच्याच ऋतुजा रवींद्र परब हिने प्रथम क्रमांक पटकावला .

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : नववी ते बारावी गट- २. प्रज्ञा सत्यवान मेस्त्री ( एम . एम . सावंत कॉलेज , कनेडी ) , ३. मीतेश राजेश पाताडे ( माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ) यांनी यश मिळविले . पाचवी ते आठवी गट २. समर्थ चंद्रकांत शिरसाट ( माध्यमिक विद्यालय शिवडाव ) , ३. अनुश्री अभिजीत राणे ( एस . एम . हायस्कूल ) . दोन्ही गटासाठी अनुक्रमे २५०० रु . १५०० रु . व १ हजार अशी पारितोषीके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला दोन्ही गटांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . यासाठी परीक्षक म्हणून रविकिरण शिरवलकर व सुनील कदम यांनी काम पाहिले . तालुका पत्रकार समितीच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी पिसेकामते येथील मैत्री गार्डन रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात यातील विजेत्यांना पारितोषीके देऊन गौरविण्यात येणार आहे . तरी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम व पत्रकार आणि मित्रचे संस्थापक अध्यक्ष रजनीश राणे यांनी केले आहे .

You cannot copy content of this page