कणकवली पत्रकार समितीचा 27 रोजी पुरस्कार वितरण सोहळा

कणकवली ता.२५-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण सोहळा रविवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा . पिसेकामते येथील मैत्री गार्डन रिसॉर्ट येथे होणार आहे. यावेळी यशस्वी उद्योजक , सामाजिक कायकर्ता , पत्रकार , छायाचित्रकार तसेच निबंध स्पर्धेतील यशस्वीतांचा पारितोषीक वितरण सोहळा व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्रच्यावतीने आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषीक वितरण सोहळा होणार आहे .

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी वैशाली राजमाने , उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे , अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक , तहसीलदार आर . जे . पवार , पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे , सचिव उमेश तोरस्कर , खजिनदार संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . यावेळी यशस्वी उद्योजक पुरस्कार ज्येष्ठ बांधकाम व्यावसायीक रघुनाथ उर्फ रघु नाईक व विल्बर्ट प्रॉपर्टीजच्या विल्सन पिंटो व दिनेश कुंभार , सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार फोंडाघाट हेल्प ॲकॅडमीचे संजय नेरुरकर , बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद अंधारी शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे , अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर , उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार गुरूप्रसाद सावंत यांना प्रदान करण्यात येणार आहे . तसेच तालुका पत्रकार समितीला नेहमीच्च सहकार्य करणारे चंद्रशेखर उपरकर यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे . तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच तालुका पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्र’च्यावतीने आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषीक वितरण सोहळाही होणार आहे . कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे , खजिनदार नितीन क यांनी केले आहे . या सोहळ्यानंतर पत्रकार व कुटुंबियांसाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे .

You cannot copy content of this page