वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले उभादांडा येथील समुद्रकिनारी वसलेल्या श्री देव सागरेश्वर मंदिरात शिवप्रेमी, शिवभक्त व भाविक व सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरीवाडी यांच्या वतीने मंगळवार दि.१ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. पासून शिवपिंडीवर संततधार, मंगळवार दि. १ मार्च रोजी महाशिवरात्री दिवशी विधीपूर्वक शिवपिंडीचे पूजन, वरदशंकर पूजा आणि होमहवन, महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता वारकरी भजन मंडळ, सायंकाळी ७ वाजता पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ उभादांडा वेंगुर्ले यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम सादर होणार आहेत.
शासन कोरोना नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
