कणकवली ता.२५-:* कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ,आपण आहात म्हणून आम्ही,ॐ नमो भगवते भालचंद्राय यांच्यावतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली संत गाडगेबाबा महाराजांबद्दल राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी विचार व्यक्त केले,
ते असे म्हणाले, गाडगेबाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्या मधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते याप्रसंगी नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी दिपक भार्गव भोसले यांचा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस दलातील मित्र अशोक माने उपस्थित होते.उपस्थित सर्वानी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
