७५ लाख खर्च करून विकसित होणार नाविन्यपूर्ण उद्यान
कणकवली ता.२५-:* कणकवलीचे नगराध्यक्ष व त्यांची टीम लोकाभिमुख कारभार करीत आहे.कणकवली शहरवासियांना पायाभूत सुविधांसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.केंद्रिय मंत्री नाम.नारायण राणे,आम. नितेश राणे यांनी कणकवली शहराच्या विकास करण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या रूपाने अभ्यासू नेतृत्व दिले आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे होत असून नागरिकांसह मुलांसाठी नावीन्यपूर्ण उद्याने विकसित करण्यात येत आहेत.हि उद्याने शहरवासियांसाठी विरंगुळ्याची केंद्रे बनतील असा विश्वास सिंधुदुर्ग जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी व्यक्त केला.
कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या गडनदी पुलाकडील श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरण कामाचे भूमिपूजन सौ.संजना सावंत यांच्या हस्ते झाले याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्य बंडू हर्णे ,सभापती मनोज रावराणे, उपसभापती मिलिंद मेस्त्री,नगरसेवक अभिजित मुसळे,संजय कामतेकर,अँड विराज भोसले,मेघा गांगण,बाबू गायकवाड,कविता राणे,मेघा सावंत,शिशिर परुळेकर,अण्णा कोदे,विठ्ठल देसाई,संजविनी पवार,राजश्री धुमाळे,संजना सदडेकर,अभय राणे,किशोर राणे,डॉ. विद्याधर तायशेट्ये,दीपक बेलवलकर,रवींद्रनाथ मुसळे,संजय ठाकूर,अजय गांगण,प्राची कर्पे,साक्षी वाळके,सुशील पारकर,गौतम खुडकर,महेश सावंत,राजन परब,समर्थ राणे,न.पं. कर्मचारी आदी उपस्थित होते.
कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या गडनदी पुलाकडील श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरणाचे काम ७५ लाख रु खर्च करून हे काम हाती घेण्यात आले आहे.काही या उद्यानात अत्याधुनिक सोइ सुविधांसह नागरिकांना व मुलांचे मनोरंजन व्हावे या दृष्टीने हे उद्यान विकसीत करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
