सेल्फी पॉईंट सर्वासाठी आकर्षणाचा केंद्र ठरेल

सेल्फी पॉइंट उभारण्याच्या कामाचा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली ता.२५-:* युवा पिढीत सध्या सेल्फीची क्रेझ आहे.हि क्रेझ लक्षात घेवून न.प.च्या माध्यमातून नमगरध्यक्ष समीर नलावडे व न.पं.चे नगरसेवक यांच्या सहकार्यातून कणकवली नरडवे चौक येथील रस्त्यालगत सेल्फी पॉईंट विकसित करण्यात येत आहे.हा सेल्फी पॉईंट सर्वासाठी आकर्षणाचा केंद्र ठरेल.असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. कणकवली शहरात उभारण्यात येत असलेल्या सेल्फी पॉइंटच्या कामाचा शुभारंभ सौ.संजना सावंत यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,सभापती मनोज रावराणे, उपसभापती मिलिंद मेस्त्री,अभिजित मुसळे,संजय कामतेकर,अँड विराज भोसले,मेघा गांगण,बाबू गायकवाड,कविता राणे,मेघा सावंत,शिशिर परुळेकर,अण्णा कोदे,संजविनी पवार,राजश्री धुमाळे,संजना सदडेकर,अभय राणे,किशोर राणे,डॉ. विद्याधर तायशेटे ,डॉ.बी.एस.म्हाडेश्वर, दीपक बेलवलकर,सुहास तायशेटे,अजय गांगण,प्राची कर्पे,साक्षी वाळके,महेश सावंत,राजन परब,दत्ताराम राणे,समर्थ राणे,न.पं. कर्मचारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page