नवव्या दिवशी सोडले धरणे आंदोलन
सिंधुदुर्गनगरी ता २३ आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर १४ फेब्रुवारी पासून सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन आज दहाव्या दिवशी मुख़्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सकारात्मक भूमिका घेत काही स्थानिक पातळीवरील मागण्याबाबत आठ दिवसात पूर्तता केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.
शिक्षक भारतीच्या वतीने आंतरजिल्हा बदलीच्या पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी आज १४ फेब्रुवारी रोजी पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते.
प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडत आपल्या मागण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.त्यामध्ये त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत.भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे .
यासाठी शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ६ या वेळेत मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी दिला होता. त्यासाठी गेले १० दिवस आंदोलन सुरु ठेवले होते. या आंदोलनाची दखल घेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलून त्यांच्या मागण्यांबाबत प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेअंती जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकारात येणाऱ्या मागण्यांबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेत काही मागण्यांबाबत आठ दिवसात निर्णय घेतला जाईल. या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे लेखी आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यामुळे गेले दहा दिवस सुरू असलेले जिल्हा परिषद समोरील बेमुदत आंदोलन अखेर आज स्थगित करण्यात आले.
असल्याचे संतोष पाताडे सांगितले. शिक्षकांचे प्रश्न शैक्षणिक कामकाजासाठी कोविड ड्युटीतुन शिक्षकांना कार्यमुक्त करावे, सातत्याने विलंबाने होत असलेले शिक्षकांचे पगार वेळेत मिळावेत, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करावे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद स्वनिधीतून गणवेश देण्यात यावा, १५ व्या वित्त आयोगातून शाळांची वीजबिले भरण्यात यावीत. अशा विविध मागण्या बाबत आज चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले यावेळी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार, उपाध्यक्ष जनार्दन पाटील ,हर्षदा राणे, मंगेश खांबलकर, रविंद्र देसाई, आदीसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
