आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेबाबत गैरसमज चुकीचे

सर्वोतोपरी सहकार्य करणार पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता २३ आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय बैठका झालेल्या आहेत. प्रशासन यात्रांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. मात्र काही लोक याबाबत गैरसमज पसरवित आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मालवण तालुक्यातील आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा आणि कुणकेश्वर येथील जत्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय बैठका पार पडल्या असून या जत्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल.

या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना च्या पार्श्वभूमीवर दोन्ही डोस पूर्ण केलेल्या व्यक्तीना एका वेळी ५० जणांना दर्शन घेता येणार आहे. दुकानांची गर्दी टाळण्यासाठी प्लास्टिक भांडी, कपडे, अशा दुकानांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक यांनी आंगणेवाडी येथे जाऊन नियोजनाचा आढावा घेतला असून प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मात्र काही लोक याबाबत राजकारण करून गैरसमज पसरवित आहेत. त्यामध्ये काहीही सत्य नाही असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषद घेवून अंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रे बाबत प्रशासकीय तयारी आणि त्याबाबत पसरविण्यात येणारे गैरसमज याबाबत माहिती दिली.यावेळी त्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी दिलेल्या निधीतून शुशोभिकरण करण्यात आले आहे. आणखी पाच कोटीचा आराखडा मंजूर केला आहे.तर आंगणेवाडी भराडी देवी मंदिर परिसर शुशोभिकरणासाठी निधी दिला जाईल. मात्र त्यासाठी तेथील आंगणे परिवारांकडून तयारी दाखविली पाहिजे. असेही यावेळी पालक मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा नियोजन कडील निधी शंभर टक्के खर्च करणार जिल्हा नियोजन कडील विकास कामाच्या यांदयाना ३० मार्चपूर्वी मंजुरी देण्यात येईल व प्राप्त झालेला निधी शंभर टक्के खर्च केला जाईल. असेही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page