छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समजावून घेऊन त्यांचा वारसा जपला पाहिजे…

माजी प्राचार्य डॉ. टी एस पाटील यांचे प्रतिपादन….

वैभववाडी प्रतिनिधी छञपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकञ करुन नव क्रांतीकारी राज्य निर्माण केले.जात, पंत,धर्म याचा विचार न करता व्यक्तीच्या कतृत्वाला महत्व दिले.छञपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेतला आहे.त्याचा वारसा जपला पाहीजे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य डाॕ.टी.एस.पाटील यांनी केले.

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित छञपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, संत गाडगेबाबा यांचा संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमात डाॕ.पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष सुनिल कांबळे, सुभाष कांबळे,महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा जि.प.सदस्या शारदा कांबळे,उपनगराध्यक्ष संजय सावंत, डाॕ.रवींद्र जाधव, डाॕ.सुरेखा जाधव, अॕड.अजितसिंह काळे, अॕड प्रताप सुतार, आॕल इंडीया धनगर समाज कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज काळे,आदी उपस्थित होते. यावेळी डाॕ.पाटील पुढे म्हणाले भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे.त्यामुळे इतिहास नीट समजून घेतला पाहीजे.अन्यथा प्रतिक्रांती येण्यास वेळ लागणार नाही असे सांगत छञपती शिवाजी महाराजांचे जीवनचरिञ अनेक संदर्भासह स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्ष संजय सावंत, व तालुक्यातील हेत गावचे सुपूञ अक्षय प्रकाश कांबळे हे सी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना काॕ.गोविंद पानसरे यांचे छञपती कोण होता? हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस रविंद्र पवार सूञसंचलन सहसचिव मारुती कांबळे तर आभार उपाध्यक्ष संतोष कदम यांनी मानले. फोटो- छञपती शिवाजी महाराज जीवनचरिञावर मार्गदर्शन करतांना माजी प्राचार्य डाॕ.टी.एस.पाटील. छाया- संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page