नेट-जेआरएफ परीक्षेत मराठी विषयात सौ. ज्योती बुवा तोरसकर यांचा देशात चौदावा क्रमांक

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अ.शि.दे .टोपीवाला हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राष्ट्रीय पातळीवर सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदासाठी झालेल्या (नेट-जेआरफ)परीक्षेत मराठी या विषयात नेत्रदीपक यश मिळवले आहे. या परीक्षेत त्यांनी मराठी विषयात देशात चौदावा क्रमांक पटकाविला आहे. सौ. ज्योती तोरसकर यांनी यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास आणि मराठी या विषयात यश मिळवले होते.

आता मराठी व इतिहास या दोन्ही विषयात सेट आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या( नेट-जेआरएफ) परीक्षेत त्यांनी यश मिळविले आहे. सदर परिक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) युजीसी मार्फत एकुण ८४ विषया साठी घेतली जाते.

डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या सदर परीक्षेसाठी संपूर्ण भारता मधून ६,७१,२८८ परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ५२,८५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ७.८७% एवढा लागला आहे. मराठी विषयासाठी झालेल्या नेट परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामधून २५२५ पैकी फक्त १९५ (७.७२%) यामध्ये परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सौ. ज्योती तोरसकर यांना प्राप्त गुण आणि सर्व प्रवर्गांचा कट ऑफ याचा विचार केला तर मराठी विषयामध्ये त्या चौदाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. मराठी व इतिहास या दोन्ही विषयात सेट आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या( नेट-जेआरएफ) परीक्षेत यश मिळवणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती मध्ये त्यांचा समावेश झाला आहे. राज्यस्तरीय सेट परीक्षेत मराठी व इतिहास या विषया बरोबरच राष्ट्रीय पातळीवरील नेट (मराठी) या परीक्षेमध्ये सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. नेट-जीआरएफ परीक्षेत मिळालेल्या यशामुळे त्यांना भारतातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लवकरच स्पर्धा परीक्षेतील आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यां साठी मार्गदर्शन सुरू करणार असल्याचे सौ. तोरसकर यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page