शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घेतला सहभाग …
बांदा ता.२२-:शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निमजगा येथे शिवजयंती निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत चित्रकला, रंगभरण, वक्तृत्व, वेषभूषा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा मध्ये उस्फूर्त सहभाग घेऊन प्रावीण्य संपादन केले.
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बांदा निमजगा शाळेतील सर्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना स्पर्धेत मार्गदर्शन व स्पर्धेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमाला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्राजक्ता राऊळ, श्री देवानंद पेडणेकर , उपाध्यक्षा श्रीमती शिल्पा सावंत, श्री प्रदीप भोगले, श्री गिरीश भोगले, श्रीमती पुष्पलता सावंत, श्री शरद सावंत, श्रीमती मनाली भोगले, श्रीमती श्रावणी बहिरे, श्रीमती संजीवनी भोगले, श्री रूपेश कानसे, अविनाश सावंत दीपक नाईक, साई सावंत , विलास भोगले , स्वानंद पवार , गणेश सावंत आणि शिव प्रतिष्ठान मंडळ बांदा निमजगा सर्व सदस्य तसेच सर्व पालक, तसेच शिक्षिका सुवर्णा भाईप शिक्षक मालू लांबर , उपशिक्षक मंगल दराडे उपस्थित होते.
