तालुक्याच्या पर्यटन विकासाची भरीव निधीची तरतूद करा…

युवासेनेची आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

दोडामार्ग ता.२२सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी व इतर कामांसाठी भरीव निधीची तरतुद करावी या मागणीसाठी युवा सेना दोडामार्गच्या वतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने अविकसित आहे.मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक स्थळे या तिराळी येथील मोठे धरण तेरवण मेढेचा उन्नयी बंधारा आदी अनेक स्थळांचा समावेश आहे.मात्र या स्थळांचा तसेच तालुक्यातील इतरही पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.यासाठी जिल्ह्यातील पर्यटन आराखड्यात दोडामार्ग तालुक्याचा समावेश करावा.अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

तेरवण मेढे बंधारा व तिलारी मुख्य धरण येथे बोटींगची परवानगी मिळावी व येथील पायाभूत सुविधांचा विकास करावा .येथे सुरू असलेले रिस्वाल्ट व काॅटेजचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे.यामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळेल तसेच तिलारी संवर्धन विकासासाठी मोठ्या प्रमाणांत निधी मिळावा रोजगारासाठी एम.आय.डीसीत उद्योगांना चालना मिळावी असेही या निवेदनात म्हटले आहे.तसेच हेवाळे, बांबरडे तुळस,घाटीवडे या भागातील शेतकऱ्यांना हत्ती व वन्यप्राण्यापासुन मोठ्या प्रमाणात नुकसान संभवते यासाठी सौरकुंपण आवश्यक असुन त्यासाठी निधी मिळावा तसेच प्रस्तावित क्रिडासंकुलाची निर्मिती लवकरात लवकर करावी आदी अनेक मागण्या या निवेदनातून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. यावेळी युवासेना समन्वयक मदन राणे, युवासेना तालुका प्रमुख भिवा गवस,तालुका संघटक संजय गवस व जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page