रत्नाकांत कदम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी ता २२ सिंधुदुर्ग जिल्हयातील चिपी विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी राजे विमानतळ असे ठेवून नामांतर करण्यात यावे. अशी मागणी रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याने सुरू झालेल्या चिपी विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव ठेवून नामांतर करण्यात यावे. अशी मागणी रतन भाऊ फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, तसेच क्रेंद्रीय नागरि उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या सर्वाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये आठवडयातून एक दिवस तक्रार निवारन दिन सुरू करा
सिंधुदुर्ग जिल्यातील गोर गरीब सर्वसामान्य जनतेवर अनेक ठिकाणी अन्याय होत असुन काही आपसातले वाद, जमीनी बळकावणे, विनाकारण त्रास देणे, मारामारी असे अनेक प्रकार दिवसे -दिवस घडत असून पोलिस ठाण्यामध्ये एखादया व्यक्तीने तक्रार नोंद केल्यावर त्याना जलद गतीने न्याय मिळत नाही. तरी याबाबत सामान्य जनतेचा विचार करून आपल्या सिंधुदुर्ग जिल्यामधील पोलिस ठाण्यामध्ये आठवडयाचा एक दिवस निश्चित करून तक्रार निवारण सुविधा सुरू करावी. जेणे करून सर्वसामान्य मानसाला तत्काळ न्याय मिळु शकेल. अशीही मागणी रत्नकांत कदम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.
