वाफोली माऊली मंदिरात महारुद्र अभिषेक संपन्न

बांदा ता.२२-:* श्री देवी माऊली पंचायतन मंदिर वाफोली येथे सोमवारी व मंगळवारी महारुद्र अभिषेक ब्राम्हणांच्या मंत्रोच्चारांनी हजारों भाविकांच्या उपस्थित भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. गेले दोन दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रमास गावातील सहकुटुंब ग्रामस्थांची उपस्थीती दिसून आली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत मंदिरात स्थानिकांची भजने, तीर्थप्रसादाचा भाविंकांनी लाभ घेतला.

सोमवारी गणपती पुजन, पुण्याहवाचन, आच‍ार्यवरण, प्राकार स्थल शुद्धी, पंच‍मृत पुजा, महारुद्र अभिषेक, महानैवेद्य आरती झाली. मंगळवारी महारुद्र अभिषेक, महापूजा, महानैवेद्य तीर्थप्रसाद, दुपारी महाआरती व महागाऱ्हाणे ब्राम्हणांच्या मंत्रोच्चारानी झाली. त्यांनतर महाप्रसादाचा लाभ हजारो भावीकांनी घेतला.

You cannot copy content of this page