बांदा ता.२२-:* इन्सुली बिलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 7 मध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवकालीन वेशभूषा व शिवचरित्रावर वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत यांच्यावतीने मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यश संपादन करणाऱ्या व सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला पारितोषिक देण्यात आले. तर यापुढेही शैक्षणिक कार्यासाठी सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे सावंत यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्या नमिता नाईक, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणपत सावंत, उपाध्यक्ष संजना सावंत, परीक्षक धनंजय केरकर, सुधीर गावडे, निळकंठ कोठावळे, राजश्री कोठावळे, अमेश कोठावळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तुषार आरोसकर व आभार प्रीती आरोसकर यांनी केले.
