मनसेची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
देवगड ता.२२-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुलापर्यंतच्या रस्तामध्ये पडलेले खड्डे श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेपूर्वी बुजविण्यात यावे अशी मागणी देवगड मनसेच्या वतीने देवगड जामसंडे मुख्याधिकरी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
या वेळी तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री,सचिव जगदीश जाधव,सामाजिक कार्यकर्ते रघुवीर वायंगणकर,शहराध्यक्ष सचिन राणे उपस्थित होते. देवगड तारामुंबरी मिठमुंबरी बीच मार्गे कुणकेश्वर हा मार्ग सर्व दुचाकी,चारचाकी ,वाहने तसेच पादचारी याना श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जाण्याकरिता सर्वात नजीकचा मार्ग देवगड हुन असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते त्यामुळे या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
