इळये येथे पारंपारिक ढोल वादन स्पर्धेत पडेल ढोलपथक विजयी

देवगड ता.२२-:* सिंहासनाधिश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती प्रतिवर्षाप्रमाणे शिवस्मरण तरुण उत्साही मंडळ इळये यांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे.इळये सरपंच जयदेव कदम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करण्यात आले,

गावातील मुलांसाठी छत्रपती शिवरायांवरील निबंध, वकृत्व आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘रक्तदान शिबिर’ संपन्न झाले, सवाह शोभयात्रा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ शिवमृदंगनाद (श्री स्वामी समर्थ मृदंग क्लासेस) सादरकर्ते:- पखवाज विशारद श्री. तुषार परब आणि विद्यार्थी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत देवगड तालुक्यातील ७ ढोल पथक मंडळांनी सहभाग घेतला होता, यामध्ये प्रथम क्रमांक श्री रवळनाथ ढोल पथक पडेल,द्वितीय क्रमांक भावका देवी ढोलपथक तिरलोट, तृतीय क्रमांक नवश्या मारुती ढोल पथक वाघोटन, चतुर्थ क्रमांक ठिकाणदार महालक्ष्मी मुटाट, उत्तेजनार्थ दाभोळे, शिवडीवाडी पडेल, कालवी आदी ढोल पथक मंडळांना सन्मानित करण्यात आले ८४ ढोल २७ ताशे वाजवत पारंपरिक ढोल पथक मंडळांना आपली कला सादर करता आली, पारंपारिक ढोल वादन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल शिवस्मरण तरुण उत्साही मंडळ इळये यांचे ढोल वादन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले,

या स्पर्धेला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या सोहळ्याला सरपंच जयदेव कदम,माजी सरपंच रमेश श्रीधर कदम,भाई कदम,प्रदीप कदम,ग्रामपंचायत सदस्या शोभा राणे,गुरुनाथ राणे,तृप्ती जाधव,सुविधा कदम,गायत्री राणे,सुरेश कदम,मुख्याध्यापिका वैशाली पवार,धर्मराज धुरत,अशोक भोग,चव्हाण मॅडम,प्रसाद कदम,विष्णू परब,चंद्रकांत परब,आदी मान्यवर उपस्थित होते,भूषण नरसाळे,राहुल कदम,अतुल परब,कल्पेश परब,संकेत कदम,संदेश कदम,विवेक कदम,विराज कदम,सूरज कदम,अथर्व मांडवकर,आयुष मांडवकर, अनुज परब,सर्वेश वारंग,प्रथमेश धुरी,सचिन वारंग,समर्थ कदम,शुभम परब,सुहास कदम,समीर वारंग,ओंकार कदम,पार्थ कदम,आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते, फोटो विजेत्या ढोलपथक संघ

You cannot copy content of this page