इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ॲंबेसेडर्स ऑर्गनाझेशन संघटनेने घेतली नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची भेट…

सुसंवाद साधत पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा…

देवगड ता.२२-:* इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अँबेसेडर्स ऑर्गनाझेशन या संघटनेच्या वतीने देवगड जा मसंडे नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा तसेच विषय समिती सभापती नगरसेवक यांची भेट घेऊन सुसंवाद साधला व त्याच्या निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .तसेच देवगड नगरपंचायत कार्यालयात शिवजयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा प्रतिमा भेट दिली.

या निमित्ताने नगराध्यक्षा ,साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,बांधकाम सभापती तेजस घाडी,आरोग्य शिक्षण सभापती नितीन बांदेकर,नगरसेवक निवृत्ती तारी, विशाल मांजरेकर,रोहन खेडेकर,नगरसेविका मनीषा घाडी,गटनेते शरद ठुकरुल तन्वी चांदोस्कर,स्वीकृत नगरसेवक व संस्था सदस्य रविंद्र चिंदरकर यांचा सन्मान करण्यात येऊन विकास कामे, व नगरपंचायत हद्दीतील समस्यांबाबत चर्चा केली.या वेळी नगराध्यक्षा यांनी विकास काम सूचनांचे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बरोबरच सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल व्यावसायिक अनिल खडपकर याना देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला.

तसेच संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक विजय कदम यांची पोलीस प्रोटेक्तशन पदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र तसेच सौ शामल जोशी यांची महिला सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद तेली, उपाध्यक्ष विलास रुमडे, जिल्हा समन्वयक सुरेश (पपु)कदम, मीडिया प्रेसिडेंट दयानंद मांगले, देवगड तालुका अपंग अध्यक्ष प्रकाश जाधव, देवगड एज्युकेशन अध्यक्ष तुकाराम तेली, पोलीस प्रोटेक्शन अध्यक्ष विजय कदम देवगड तालुका महिला उपाध्यक्ष सौ शुभांगी तेली, तसेच रविकांत चांदोस्कर, सदस्य स्वीकृत नगरसेवक रवींद्र चिंदरकर, नंदकिशोर परब, सौ शामल जोशी कौस्तुभ काळे, उमेश कुबडे, सौ दीपिका मेस्त्री, उपस्थित होत्या

You cannot copy content of this page