Headlines

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात उद्या साजरा होणार प्रगट दिन सोहळा…

सावंतवाडी ता.२२-:* मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रगट दिन सोहळा संपन्न होणार आहे.बुधवारी सकाळी श्री गजानन महाराजांची पाद्यपूजा अभिषेक महाआरती व दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच दुपारी 3 वाजता गायनाचा कार्यक्रम, रात्री 7 वाजता पालखी सोहळा, व रात्री 10 वाजता श्री मुसळेश्र्वर नाट्य मंडळाचा अधांतर हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थान समितीने केली आहे.

You cannot copy content of this page