वेंगुर्ला प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताचे औचित्य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ माणिकचौक वेंगुर्लातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात नेहा जाधव तर लहान गटात स्वरांगी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवप्रमी मित्रमंडळ माणिकचौक, वेंगुर्ला आणि विवेक कुबल व प्रणव वायंगणकर यांच्या संयुक्त विद्यमाने माणिकचौक येथील व्यासपिठावर आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रेमी विवेक कुबल यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १६ वर्षाखालील गटांत २५ तर १६ वर्षावरील गटांत ७ स्पर्धेकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. मोठ्या गटांत व्दीतीय-संजना पवार, तृतीय-भक्ती जामसंडेकर, तर उत्तेजनार्थ-ईशा गोडकर यांनी तर लहान गटांत व्दीतीय-भास्कर सांगळे, तृतीय-सानिका सावंत तर उत्तेजनार्थ- काव्या गावडे व पूर्वा सावंत यांनी पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण नेहा यरनाळकर, प्रतिक्षा मालवणकर, प्राची मणचेकर, सौरभ माळवदे, स्मिता कोयंडे यांनी केले.
बक्षिस वितरण विवेक कुबल यांच्या हस्ते व नितीश कुडतरकर, रमाकांत सातार्डेकर, प्रथमेश यंदे, रोहित वेंगुर्लेकर, कुणाल बांदेकर, प्रसाद चव्हाण तसेच परिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.
