उंच्च शिखरावर नेऊन ठेवलेली चळवळ पुढे नेऊन विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भवितव्य साकार करावे…

हितवर्धक एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सूर्यकांत दळवी यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी ता २२-:* स्काऊट गाईड आणि कब बुलबुल ही चळवळ लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी उच्च शिखरावर नेऊन ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांचा जन्मदिन चिंतन दिन म्हणून जगभर साजरा केला जात आहे. याची स्फूर्ती आणि प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन लॉर्ड बेडन पॉवेल यांनी उच्च शिखरावर नेऊन ठेवलेली चळवळ पुढे न्यावी व यातून आपले उज्वल भवितव्य साकार करावे. असे प्रतिपादन तळगाव हितवर्धक एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सूर्यकांत दळवी यांनी केले .

तळगाव हितवर्धक एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून रामेश्वर विद्यालय तळगाव येथे लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंती पर “चिंतन दिन” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन तळगाव एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सूर्यकांत दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. शिरोडकर, स्काऊट गाईडच्या कार्यक्रम अधिकारी शुभांगी तेंडुलकर, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर ,सेवानित्त मुख्याध्यापक प्रदीप शिंदे, स्काऊट गाईडच्या अर्चना बागवे, प्रवीण खोचरे, सलीम शेख ,स्काऊट गाईडच्या सौ सावंत , लक्ष्मण मिसाळ प्रशाळेचे शिक्षक स्काऊट गाईड विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी सर्वधर्म प्रार्थनांचे पाठ घेण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन करून स्काउट गाईड च्या कार्यक्रम अधिकारी शुभांगी तेंडुलकर यांनी प्रार्थना पठनाला सुरुवात केली. चिंतन दिना निमित्त पठण कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला व त्याला प्रतिसादही चांगला मिळाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद जैतापकर यांनी केले .

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक आणि संस्थेचे चेअरमन सूर्यकांत दळवी यानी आपले बहुमुल्य विचार मांडताना स्काऊट गाईडच्या माध्यमातून तळगाव सारखा या छोट्याशा गावात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनी जगभर साजरा होणाऱ्या या चिंतन दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबद्दल स्काऊट गाईडचे आभार व्यक्त करत पॉवेल यांनी स्काऊट गाईड च्या माध्यमातून जगभरात उभी केलेली चळवळ विद्यार्थ्यांच्या मनामनात स्पुर्ती आणि प्रेरणा देणारी आहे.

आजच्या या कार्यक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांची प्रेरणा जागृत ठेवून आपले उज्वल भवितव्य घडवावे असे विचार दळवी यांनी व्यक्त केले . यावेळी स्काऊट गाईड च्या जेष्ठ गाईड अर्चना बागवे यांनी जागतिक कीर्तीचे लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या कार्याचा उजाळा देत त्यांच्या माध्यमातून स्काऊट गाईड आणि बुलबुल ही चळवळ जगभरात सुरू झाली जागतिक कीर्तीचा महान स्काऊट गाईड उपक्रम आज शासनाच्या माध्यमातून राबविला जात आहे आजच्या या जिल्हास्तरीय चिंतन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्काऊट गाईड च्या कार्यक्रम अधिकारी शुभांगी तेंडुलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्काऊट गाईड आणि रामेश्वर विद्यालय तळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा जिल्हास्तरीय चिंतन दिन कार्यक्रम घेण्यात आला आहे लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काऊट गाईड आणि कब बुलबुल चळवळ पुढे नेली त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण होऊन अनेक स्काऊट गाईड विद्यार्थी राज्य उच्चशिखरावर राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकतील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रपती पुरस्कृत गाईड विदयाथीनी संजना सावंत यांच्या सारखे अनेक विद्यार्थी या जिल्ह्यात पुढे आल्या आहेत त्यांना लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत केले जाईल त्यांची प्रेरणा आपण स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी घेऊन आपणही अशा प्रकारचे राज्य राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्नशील व्हा आणि ही सामाजिक चळवळ प्रत्येकाने आत्मसात करावे हीच खरी लॉर्ड बेडन पावेल यांना मानवंदना ठरू शकेल .

या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्काऊट गाईड श्रीमती सावंत राष्ट्रपती पुरस्कृत गाईड संजना सावंत यांनीही आपले विचार व्यक्त करताना आपल्यासारखे सर्व विद्यार्थ्यांनी या चळवळीत पुढे होऊन राज्य ,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून घ्यावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रशाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. शिरोडकर यांनी मानले या कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना स्काउड गाईड विषयक विविध उपक्रम आणि प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले.

You cannot copy content of this page