वेंगुर्ला ता.२२-:* वेंगुर्ला नगर वाचनालयाच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत सन २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष-अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष-अॅड.देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष-अनिल सौदागर, कार्योपाध्यक्ष-शांताराम बांदेकर, कार्यवाह-कैवल्य पवार, उपकार्यवाह-माया परब व अंतर्गत हिशोब तपासणीस सखाराम सौदागर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन होडावडेकर यांनी काम पाहिले.
वाचनालयाची मासिक सभा १२ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यावेळी निवडलेल्या कार्यकारी मंडळात अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, अॅड.देवदत्त परुळेकर, अनिल सौदागर, शांताराम बांदेकर, कैवल्य पवार, माया परब, राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, प्रा.महेश बोवलेकर, दीपराज बिजितकर, मंगल परुळेकर यांचा समावेश आहे.
