माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन
सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडीत येणाऱ्या काळात पुन्हा एकदा सुखाचे दिवस परतून येतील असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी आपण गेल्या दोन अडीच वर्षात काय झाले. याबाबत आपण काही टीका करणार नाही. असे स्पष्ट केले आहे. सावंतवाडीला जर नव्याने सुखाचे दिवस हवे असतील तर पुन्हा एकदा १७-० च्या वेळी जी टीम निवडून दिली होती. तीच टीम पुन्हा निवडून द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव,माजी नगरसेवक सुरेश भोकटे,रवि जाधव इफतिगार राजगुर, जावेद शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले शहरात पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर यावे यासाठी मी पुन्हा एकदा राजकारणात यावे अशी शहरातील नागरिकांची ईच्छा आहे. त्यासाठी निवडणूक लढवली पाहिजे असे काही नाही. परंतु, वेळ आल्यावर नक्कीच विचार करून निर्णय घेऊ असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, जर आगामी नगरपालिका निवडणुकीला माजी नगराध्यक्षा सौ पल्लवी केसरकर ह्या उभ्या राहिल्या तर निश्चितच आपला त्यांना पाठिंबा असेल. असे त्यांनी जाहीर केले आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत आपले केवळ वैचारिक मतभेद होते. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
