रेशन दुकान मिळण्यासाठी तहसीलदार समोर सुरू आहे उपोषण
सावंतवाडी ता.२२-:* तालुक्यातील कारिवडे गावाला गेली अनेक वर्ष गावाला कायम स्वरुपी रेशन धान्य दुकान परवाना मिळावा यासाठी पाठपुरावा चालू होते. परंतु, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आज कारिवडे ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडले असून, या उपोषणाला भाजप नेते तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिवसेना उप जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे पंचायत समिती माजी सभापती पंकज पेडणेकर, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर यांनी भेट देत या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
यावेळी जो पर्यंत पुरवठा अधिकारी येत नाही.
तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी सरपंच अपर्णा तळवणेकर, मंगेश तळवणेकर, प्राजक्ता केळुस्कर, केशव साहिल, महेंद्र गवळी, आनंद तळवणेकर, महादेव मेस्त्री, रसिका केदार, शशिकांत सावंत, रत्नमाला शेर्लेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
