शिरवंडे येथील जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत २५ पदकांची लयलूट
ओरोस ता.२१-:* सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अमचुर अथलेटिक्स सिंधुदुर्ग यांच्यावतीने 2 डिस्ट्रिक्ट लेवल शाळा आणि ज्युनिअर कॉलेज अथलेटिक्स २०२२ ही स्पर्धा माकवन तालुक्यातील शिरवंडे येथील त्रिमूर्ती विद्यालयाच्या क्रीडांगणावर नुकतीच पार पडली.
यामध्ये अथलेटिक्स प्रशिक्षक शंकर नंदू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व डॉन बॉस्कोमधील २६ खळाडूनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी एकूण २५ पदके मिळविली असून डॉन बॉस्को हायस्कुलच्या विद्यार्थ्यानी सांघिक विजेते पद मिळविले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत कु. मानस भालचंद्र दाभोळकर यांने तीन सुवर्ण पदक घेऊन वैयक्तिक विजेते पद मिळवीले आहे.
१० वर्षाखालील मुलांच्या गटात अभिषेक पवार,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधुदुर्गनगरी याने ५० मी. धावणे प्रकारात कांस्य पदक. १०० मी.धावणे धावणेमध्ये रौप्या पदक, लांब उडीमध्ये रौप्या पदक मिळविले आहे. १२ वर्षा खालील मुलांच्या गटात कविष कृष्णा जंगले, जिल्हा परिषद शाळा, रानबांबुळी याने १०० मी. धावणेमध्ये कांस्य पदक मिळविले आहे. तसेच 4 बाय 100 रिले प्रकारात डॉन बॉस्को हाय स्कु्लच्या मुलांनी यश मिळविले आहे. लावण्याा गावित हिने रौप्या पदक, मयुरेश राणे रौप्य पदक, आदित्य जाधव याने रौप्य पदक, आदित्य राठोड याने रौप्य पदक मिळविले आहे.
१४ वर्षा खालील मुले गटात मानस बांदेलकर, डॉन बॉस्कोय हाय स्कु्ल याने १०० मी. धावणे प्रकारात सुवर्ण पदक, २०० मी. धावणे प्रकारात रौप्य पदक, पारस बांदेलकर, डॉन बॉस्को हायस्कुल याने २०० मी. धावणे प्रकारात कांस्य पदक, १६ वर्षा खालील मुले गटात मानस दाभोलकर,डॉन बॉस्कोत हायस्कु्ल याने ८० मी. धावणेमध्ये सुवर्ण पदक, १०० मी. धावणेमध्ये सुवर्ण पदक, २०० मी. धावणेमध्ये सुवर्ण पदक अशी वैयक्तिक विजेते पदके मिळविली आहेत. १८ वर्षा खालिल मुले गटात प्रथमेश राणे, दादासाहेब तिरोडकर कनिष्ट महाविद्यालय याने गोळा फेकमध्ये सुवर्ण पदक, १२ वर्षा खलिल मुली गटात शमिका चिपकर,कुडाळ शाळा कुडाळ हिने भाला फेकमध्ये सुवर्ण पदक, लांब उडीमध्ये रौप्य पदक, ५० मी. धावणेमध्ये रौप्य पदक, १०० मी. धावणे प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे. तर १६ वर्षाखालील मुली गटात संजना पवार, न्यू इंग्लीश स्कुल ओरोस हिने गोळा फेक प्रकारात कांस्य पदक मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक शंकर पवार यांनी अभिनंदन केले आहे.
