सामाजिक वनीकरण बाबतच्या तक्रारीची होणार चौकशी

सभापती नूतन आईर यांच्या तक्रारीची दखल

ओरोस ता.२१-:* कुडाळ सभापती नूतन आईर यांनी आपल्या पंचायत समितीच्या एका बड्या अधिकाऱ्याने खोटी माहिती देऊन सामाजिक वनीकरणचे लाखो रुपयांचे अनुदान लाटले असल्याची तक्रार कोकण विभागाच्या रोजगार हमी योजना उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांच्याकडे केली होती. याची गंभीर दखल घेऊन उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांनी सिंधुदुर्ग रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

६ फेब्रुवारी २०२२ रोजी याबाबत अर्ज कुडाळ सभापती सौ आईर यांनी उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांच्याकडे ई-मेलद्वारे केला होता. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी यांनाही ई-मेलद्वारे अर्ज करीत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार रोजगार हमी कोकण विभाग उपायुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर रोजगार हमी उपजिल्हाधिकारी यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवत याप्रकरणी चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले आहे.

You cannot copy content of this page