भाजपाने विविध समस्यांबद्दल दुय्यम निबंधकाना विचारला जाब

शासकीय योजना नोंदणीचे मूल्याकंन कमी करा; दस्त नोंदी तातडीने मार्गी लावा

कणकवली ता.२१-:* कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय योजनांच्या बक्षीसपत्र किंवा अन्य नोंदी करण्यासाठी बिनशेती दराने स्टॅम्प ड्युटीची आकारणी केली जाते. अन्य तालुक्यात वेगळा नियम व कणकवलीत वेगळा आहे का? गुरुवारपासून इंटरनेट नसल्यामुळे ३५ ते ४० दस्तच्या नोंदी प्रलंबित आहेत, ते केव्हा होणार? अशी विचारणा कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, सभापती मनोज रावराणे यांनी दुय्यम निबंधक श्रेणी -१ कणकवली एम.एम.कुरुंदकर यांना केली.

कणकवली भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळाने दुय्यम निबंधक कार्यालयातील विविध समस्यांबाबत दुय्यम निबंधक श्रेणी -१ कणकवली एम.एम.कुरुंदकर जाब विचारला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस बबलू सावंत फोटो सरपंच हेमंत परुळेकर पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी श्रीमती कुरुंदकर यांनी आता इंटरनेट चालू झाला आहे, लगेच नोंदी चालू करते याचबरोबर नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही ,असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर इंटरनेट खाजगी घेण्याबाबत निविदा मंजूर झाली आहे,त्याचे पत्र तुम्हाला आले असताना अद्याप जोडणी का केली नाही? अशी विचारणा संतोष कानडे यांनी दुय्यम निबंधक यांना केली.तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगी इंटरनेट घेता येत नसल्याचे सांगितले. यावेळी भाजपा शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत पर्यायी व्यवस्था करा, जर इंटरनेट बंद असेल तर त्यावेळी ऑफलाइन पद्धतीने दस्त स्वीकारा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतोष कानडे यांनी दिला.

You cannot copy content of this page