पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा पर्यटन व्यावसायिकांना शब्द;पर्यटन वाढीसाठी धोरण ठरविण्याचेही दिले आश्वासन
मालवण ता.२१-:* जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक महिन्यात आपण पुन्हा तारकर्ली येथे येऊन इथल्या पर्यटन व्यावसायिकांशी चर्चा करू व पर्यटन वाढीसाठी शासन स्तरावर निश्चितपणे धोरण ठरवू अशी ग्वाही राज्याचे पर्यटन विकास मंत्री नाम. आदित्य ठाकरे यांनी येथे बोलताना केले.
राज्याचे पर्यटन मंत्री ना आदित्य ठाकरे यांच्या तारकर्ली दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ तसेच तारकर्ली येथील पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ना ठाकरे यांची भेट घेत पर्यटन व्यवसायातील समस्या व पर्यटन व्यवसाय वाढीसाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांची मंत्रालयात बैठक आयोजित करावी अशा आशयाची मागणी केली यावेळी ना ठाकरे यांनी एक महिन्यात आपण पुन्हा तारकर्ली येथे येऊन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पर्यटन व्यावसायिकाच्या समस्या जाणून घेऊ व त्या मार्गी लावू असे आश्वासन दिले
यावेळी मालवण तालुका पर्यटन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अवी सामंत, सहदेव साळगावकर, रामा चोपडेकर , तारकर्ली पर्यटन संस्था सचिव. दादा वेंगुर्लेकर, पर्यटन व्यवसायिक संघटना महिला अध्यक्ष मेघा सावंत, उपाध्यक्ष मिलिंद झाड, अन्वेषा आचरेकर, दीप्ती तारी, शशांक कुमठेकर, संदीप बोडवे, प्रभाकर वाळवे आणि वायरी, तारकर्ली, देवबाग गावातील असंख्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते
