महिला मेळाव्याचे दिले आमंत्रण
कणकवली ता.२१-:* पश्चिम महाराष्ट्र महिला पतंजली समितीने 10 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर पतंजली पश्चिम महाराष्ट्र महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांची पतंजली योगपीठ हरिद्वार येथील महिला केंद्रीय प्रभारी सौ.सुधा अल्लीमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी पतंजलीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांना मेळाव्यासंबंधी माहिती देऊन मेळाव्याचे विशेष आमंत्रण दिले. उदय सामंत यांनी देखील या मेळाव्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करुन मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन पतंजली महिला पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी पतंजली महिला राज्य कार्यकारिणी सदस्या मंगला वैद्य, अनिता जोशी, रमा जोग, सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री रश्मी आंगणे, सिंधुदुर्ग युवती प्रभारी श्वेता गावडे, नगरसेविका शिल्पा सुर्वे, सुरेखा शिंदे आदी पतंजली महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
