युवराज लखमराजे खेमसावंत-भोसले, आ दीपक केसरकर यांची उपस्थिती; युवराजाच्या आग्रहास्तव आज पुन्हा एकदा त्याच नाट्य प्रयोगाचे आयोजन…
सावंतवाडी ता.२१-:* स्वराज्य संघटना, सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशा स्वरूपातील शिवजयंती उत्सवात काल अजरामर अशी ऐतिहासिक नाट्य कलाकृती “इथे ओशाळला मृत्यू” या नाटकाचा प्रयोग सावंतवाडी संस्थानचे युवराज लखनराजे खेमसवांत भोसले आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत राजवाडा येथे पार पडला होता. या नाट्य प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला होता.
हा नाट्य प्रयोग युवराज लखनराजे खेमसावंत भोसले यांना अतिशय आवडल्याने त्याच्या आग्रहास्तव खास सावंतवाडीतील नाट्य प्रेमींसाठी आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पुन्हा एकदा या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून, आज रात्री ठीक ९:०० वाजता राजवाडा येथे हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या नाट्य प्रयोगाला सावंतवाडीतील तमाम नाट्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य संघटनेकडून करण्यात आले आहे.
