घाम फुटला म्हणून पत्रकार परिषद घेतली’,

राणेंचा राऊतांवर घणाघाती ‘प्रहार’

मुंबई संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात उतरले आहे. ‘चुकीच्या कामामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता, हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहेत.’ असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर जोरदार घणाघात घातला आहे.

’15 फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला उपस्थित होता. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर किंवा आमचे मित्र राज्यसभेचे संजय राऊत यांची परिषदेत जी केविलवाणी परिस्थिती झाली होती, जो घाम फुटला होता तो कशामुळे फुटला होता, विरोधकांनी फोडला की चुकीच्या कामामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता, हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहेत, अशी खिल्ली राणेंनी उडवली. 

You cannot copy content of this page