वसुंधरा विज्ञान केंद्राच्या जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत कुणकेरी शाळेचे यश

सावंतवाडी ता.१६-:* वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेरी नंबर 1च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष राजन मडवळ, मुख्याध्यापक विठ्ठल कदम, शिक्षक पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले

ओझोन वायूविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित ओझोन वायू पृथ्वीचा रक्षक या निबंध स्पर्धेत गट क्र 1 पहिली ते चौथीमधून सहदेव एकनाथ चव्हाण इ 3 री याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर अथर्व संजय मेस्त्री इ 3 री याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच बंध पर्यावरणाशी राखी निर्मिती स्पर्धे गट क्र 1 पहिली ते चौथी मधून श्रीराज गणेश परब इ पहिली यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर आदित्य महादेव परब इ पहिली याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका नीता नितीन सावंत यांचे मार्गदर्शन लाभले सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 28 फेब्रुवारी विज्ञान दिनी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार येथे संपन्न होणार आहे

You cannot copy content of this page