खारेपाटण येथे आलेल्या प पू स्वभावसागरजी महाराज यांचे प्रवचन संपन्न

जैन बांधवांनी घेतले आशीर्वाद

देवगड ता.१६-: जैन समाजाचे प.पु.१०८ स्वभावसागरजी महाराज यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी नियमित समाज बांधवांना प्रवचन दिले .त्यांचे केशलोच कार्यक्रम दि .१४ फेब्रु रोजी खारेपाटण येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.या निमित्ताने बहुसंख्य जैन समाज बांधवानी त्यांचे आशीर्वाद घेतले.

प.पु.१०८ स्वभावसागरजी महाराज यांच्या खारेपाटण येथील वास्तव्यात त्यांचे उपस्थितीत खारेपाटण जीन मंदिरात भगवान पार्श्वनाथ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता .त्याच बरोबर अनेक ठिकाणी भेटी दिल्या ,आहार घेतला. ध्यानधारणा केली.त्यांच्या आगमन आणि वास्तव्यामुळे खारेपाटण जैन मंदिर येथील वातावरण भक्तिमय झाले होते. नुकतेच ते खारेपाटण येथून कळे कोल्हापूर येथे विहार करीत मार्गस्थ झाले .

You cannot copy content of this page