एसटी संपामुळे बाजारपेठत मंदी

तोडगा काढून संप मिटवावा;देवगड व्यापारी संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देवगड ता.१६-: रापम कामगारांचा गेली तीन महिने संप दुखवटा सुरू असल्याने स्थानिक बाजारपेठेत मंदी निर्माण झाली आहे .तसेच ग्रामीण भागातील छोटे व्यापारी प्रवासी ,विद्यार्थी यांची गैरसोय झाली असून स्थानिक व्यापार मंदावला आहे.या संपावर तात्काळ तोडगा काढण्यात येऊन जनतेची प्रवासी वर्गाची गैरसोय दूर करून एसटी सेवा पूर्ववत करावी अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघ यांच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे देवगड तहसीलदार मारुती कांबळे तसेच देवगड आगार स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांचेमार्फत लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाच्या प्रति संबंधीत मंत्रीमहोदय,खासदार,पालकमंत्री आमदार यानाही रवाना करण्यात आल्या आहेत.

या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे एसटी ही ग्रामीण भागाची नाळ असून ती सेवा ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनता बाजाररहाट औषधोपचार,अन्य कारणास्तव शहरी भागात येऊ शकत नाही अर्थातच त्याचा परिणाम बाजारपेठेवर अन्य व्यासायावर होतो.देवगड तालुका पर्यटकांचे आकर्षण असून बाहेरील पर्यटक देखील कमी प्रमाणात येत आहेत.शहरी प्रवासही बंद असल्याने हॉटेल व्यासायावर अन्य तत्सम व्यवसाय मंदावले आहेत तरी लवकरात लवकर एसटी सेवा सुरू करावी अशी मागणी व्यापारी बंधू,मच्छिमार बांधव स्थानिक नागरिक यांचेकडून होत आहे. या वेळी तालुका अध्यक्ष शैलेश कदम, दयाळ गावकर,दयानंद पाटील,जगन्नाथ कोयंडे, अजित खडपकर,श्री वारीक,दिनेश पटेल,शामनाथ बांदकर,मिलिंद कुबल,व अन्य व्यापारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page