दोडामार्ग ता.१६-: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन दोडामार्ग तालुक्यातील नवोदित दशावतार कलाकारांचा “महिषासुर जन्म” हा नाट्यप्रयोग आयोजित कऱण्यात आला आहे. हा नाट्य प्रयोग २०फेब्रुवारी रोजी आयनोडे झरेबांबर येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात रात्री ८:०० वाजता होणार आहे. या नाट्यप्रयोगाला मोठ्या संख्येने व शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहाण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या नाट्य प्रयोगात दोडामार्ग तालुक्यातील नवोदित प्रतिभावंत दशावतार कलाकार भूमिका साकारणार आहेत
