Headlines

कणकवलीत संत रविदास महाराज जयंती साजरी

कणकवली ता१६-: संत रविदास महाराज एक फार मोठे संत होऊन गेले. वाराणसी येथे जन्मलेले हे गुरू क्षत्रिय योद्धे होते. भारतीय धार्मिक परंपरेतील सतरा संतापैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे.

जयंतीनिमित्त त्यांचे आचार, विचार आत्मसात करून समाजासाला दिशा देण्याचं काम करूया असे प्रतिपादन चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ आयोजित चर्मकार समाजाचे गुरू संत शिरोमणी महाराज यांची जयंती चंदू भोसले यांच्या निवासस्थानी करण्यात आली.त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,तालुका सचिव अनंत जाधव,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,जिल्हा संघटक लवेंद्र किजिवडेकर, जिल्हा सदस्य प्रभाकर चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष शरद जाधव, सुधीर जाधव ,अनिल चव्हाण, चंदू भोसले, सदस्य अशोक नारकर, महेंद्र चव्हाण,माजी तालुका सचिव संदीप जाधव,माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश साळसकर,सुंदर जाधव,संदेश पाताडे,संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page