युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट
कणकवली ता.१६-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यावर व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर संचालक म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी मुंबईत युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल व जिल्हा बँक संचालक पदी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल सुशांत नाईक यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुशांत नाईक यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते.तसेच युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर सुशांत नाईक यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा सैनिकांचे संघटन करून शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टीने सुरु असलेल्या उपक्रमांचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काळात सर्व सत्तास्थाने शिवसेनेकडे आली पाहिजे त्यासाठी काम सुरू करा. असे आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकण व सिंधुदुर्गावर विशेष प्रेम असून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेना यापूर्वीही आघाडीवर होती व यापुढेही राहील अशी ग्वाही देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्याची माहिती सुशांत नाईक यांनी दिली. फोटो सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मुंबईत युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे यांची भेट घेतली यावेळी सोबत आम.वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर.
