सांगेली ग्रामस्थांचे पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

केंद्र शाळेच्या दुरुस्तीसाठी पालक व ग्रामस्थ आक्रमक;ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय

सावंतवाडी ता.१६-:* सांगेली येथील केंद्र शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करून देखील संबधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने सांगेली येथील संतप्त ग्रामस्थांनी आज सावंतवाडी पंचायती समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले.

सांगेली येथील केंद्र शाळेच्या इमारतीचे छप्पर हे मोडकळीस आल्याने ते केव्हाही कोसळेल या भीतीने दुरुस्तीसाठी पालक व ग्रामस्थांनी संबंधित विभागांकडॆ वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र त्याची कोणीही दखल न घेतल्याने पालक व ग्रामस्थांनी उपोषण छेडले. यावेळी छपराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, तसेच शाळेचा दर्जा सुधारण्यात यावा, अशी मागणीही उपस्थितांकडून करण्यात आली. दरम्यान जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.

You cannot copy content of this page